⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | गुन्हे | कमरेला पिस्टल लावून फिरत होता; पोलिसांनी माहिती मिळताच शिताफीने घेतलं ताब्यात

कमरेला पिस्टल लावून फिरत होता; पोलिसांनी माहिती मिळताच शिताफीने घेतलं ताब्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२३ । गणेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांनी सापळा रचून एका तरुणास पिस्टल व जिवंत काडतुससह ताब्यात घेतले. गौरव राजेंद्र पाटील (वय – २६ रा. गोराडखेडा ता. पाचोरा) असं अटक केलेल्या तरुणाचे नाव असून पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पुढील होणारा अनर्थ टळला.

नेमका काय आहे प्रकार?
गोराडखेडा गावातील दर्ग्या जवळ एक तरुण कमरेला पिस्टल लावुन फिरत असल्याची माहिती गुप्त खबर्‍याकडुन पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांना मिळाली होती.सदरची माहिती पो. कॉ. योगेश पाटील यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना दिल्याने त्यांनी लगेचच पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पो. कॉ. योगेश पाटील, राहुल बेहरे, विश्वास देशमुख, प्रकाश शिवदे, संदिप भोई, विनोद बेलदार यांचे पथक तयार करुन घटना स्थळाकडे रवाना केले.

पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी साध्या गणवेशात सापळा रचून संशयीत गौरव राजेंद्र पाटील याला पिस्टल व जिवंत काडतुस सह शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीची पिस्टल व ५ जिवंत काडतुसे तसेच त्याच्या ताब्यातील ४० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करीत आहे. गणेश उत्सवाच्या पुर्व संध्येला शहरात सर्वत्र खरेदीची वर्दळ सुरू असतांना शहरा पासुन दोन कि. मी. अंतरावर जिवंत काडतुसे व पिस्टल बाळगणारा तरुण पाचोरा पोलिसांच्या सापळ्यात अडकल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पुढील होणारा अनर्थ टळल्याने पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या सह तपास पथकाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.