जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडा मार्केट येथील एका लॉजवर लॉजच्या आड अवैधरीत्या कुंटणखाना सुरू होता. याची माहिती पोलिसांनी मिळताच छापा टाकून आंबटशौकीन पुरूषांसह पाच महिलांना ताब्यात घेतलं आहे. आज मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडा मार्केट येथील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून पंटर पाठवल्यानंतर खात्री होताच छापा मारला.
दरम्यान, या सर्व प्रकाराची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 5 महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले. या प्रकारामुळे परीसरात खळबळ उडाली आहे. याच प्रकारचा अनैतिक व्यवसाय हा अनेक लॉजेसवर सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरिीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे आदींच्या पथकाने केली.