---Advertisement---
गुन्हे पारोळा

Parola Accident : भरधाव कारने सायकलस्वार युवकाला चिरडले ; संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२३ । जिल्ह्यात अपघाताचे प्रमाणत दिवसेंदिवस वाढत असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. अशातच पारोळा शहरात भरधाव वेगाने आलेल्या कारने सायकलस्वाराला चिरडल्याची घटना घडलीय. शामराव मराठे (वय ३५) असं मृताचे नाव असून सदर घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

parola accident jpg webp webp

पारोळा शहरतील बायपास हायवेवर सदर अपघात झाला. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजी शामराव मराठे (वय ३५) हा धरणगाव चौफुलीवर रस्त्या ओलांडून शहराकडे सायकलने जात होते. याचवेळी जळगावच्या दिशेने धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने सायकल चालकास जोरदार धडक दिली. यात सायकल चालक शिवाजी हे पंधरा ते वीस फूट अंतरावर फेकले गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

---Advertisement---

दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच नागरिकांनी धाव घेतली. यावेळी शहरवासीयांनी धरणगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करत गतिरोधक बसवण्याची तसेच विजेची व्यवस्था करण्याची मागणी केली. तर घटनास्थळी (Police) पोलिसांच्या पथकाने चौफुलीवर जमलेल्या युवकांची समजूत काढत कार चालकावर गुन्हा दाखल करून वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही दिल्यानंतर एक तासाने रस्ता मोकळा करण्यात आला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---