जळगाव शहर

जळगाव मनपा प्रशासनाने लस खरेदी करावी : भाजपची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ ।  जळगाव शहर महापालिकेद्वारा शहरातील नागरिकांना covid-19 च्या मोफत लसीकरणासाठी लस खरेदी करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे व  महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.

काय म्हटलं आहे निवेदनात : 

गेल्या वर्षभरापासून देशासोबत जळगाव जिल्ह्यातील पाच लाख नागरिक covid-19 च्या साथीशी लढा देत आहे.  मार्च २०२१  पासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेत शहराची रुग्णसंख्या व मृत्यू या दोन्हींचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या केंद्र सरकारद्वारे मोफत लसीकरण सुरू आहे परंतु अद्यापही   लाखो जळगावकरांना covid-19 च्या प्रतिबंधासाठी लसीचे प्रतीक्षा करावी लागते. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांनी नागरिकांसाठी स्वतःच्या बजेटमध्ये covid-19 ची लस खरेदी करण्यासाठी निविदा काढली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरवासियांना लवकरात लवकर मोफत covid-19 लस मिळविण्यासाठी आपण महानगरपालिकेच्या निधीतून खरेदी करावी जेणेकरून शहरातील कोरोनाचा  वाढता प्रादुर्भाव टाळण्यास मदत होईल अशी मागणी भाजपा महानगरच्या वतीने करण्यात आली.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी  स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, भाजपा गटनेते भगत बालाणी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नगरसेवक धीरज सोनवणे आदी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button