⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मोठी बातमी : जळगावात जुनी इमारत कोसळली, बचावकार्य सुरू

मोठी बातमी : जळगावात जुनी इमारत कोसळली, बचावकार्य सुरू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २९ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात असलेल्या मस्जिद समोरील जीर्ण इमारत मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. इमारती खाली एक महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे. घटनास्थळी जेसीबी आणि पोलीस पोहचले आहेत

जळगाव शहरात अनेक जुन्या इमारती असून मनपा प्रशासनाने त्या मालमत्ताधारकांना नोटीस देखील बजावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज नगरातील मस्जिद समोर असलेली एक जुनी इमारत ८.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २ महिला अडकल्या होत्या. दरम्यान, लागलीच बचावकार्य सुरू केल्याने राजश्री सुयोग पाठक वय – ५२ यांना बाहेर काढण्यात यश आले. अद्याप एक वृध्द महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे.

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी धाव घेतली आहे. इमारत जीर्ण झालेली असल्याने त्यात फारसे कुटुंब रहिवास करीत नसल्याने मोठी हानी टळली आहे. जळगाव शहरातील इतर जीर्ण इमारतींच्या बाबतीत मनपा प्रशासनाने लवकरात लवकर कठोर पाऊले न उचलल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.