⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | गुन्हे | आई-वडिल कामाला ; घरी एकुलत्या मुलाने उचललं धक्कादायक पाऊल, जळगावातील घटना

आई-वडिल कामाला ; घरी एकुलत्या मुलाने उचललं धक्कादायक पाऊल, जळगावातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरातील कांचन नगर भागात २० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पवन सुरेश राजपूत असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पवनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पवन हा गेल्या काही वर्षांपासून महापालिकेतील घंटागाडीवर कंत्राटी पध्दतीने कामाला होता. बुधवारी पवनने रजा घेतल्याने, तो कामावर गेलेला नव्हता. सकाळी जेवण केल्यानंतर आपल्या मित्रांसोबत काही वेळ घालविल्यानंतर सायंकाळी ५ वाजता घरी परतला. आई-वडिल कामावर गेल्यामुळे पवन हा घरी एकटाच होता. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पवनने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

सायंकाळी ६ वाजता पवनची आई गीताबाई या घरी परतल्यानंतर दरवाजा उघडताच गळफास घेतलेला पवनचा मृतदेह दिसला. पवनचा मृतदेह पाहताच आईने जोरदार हंबरडा फोडला. पवनच्या आईचा आवाज ऐकल्यानंर शेजारील रहिवाशी पवनच्या घरात पोहचले, शेजाऱ्यांनी झालेल्या घटनेची शनिपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत, पवनचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला.

पवनच्या पश्चात मोठी बहिण असून, बहिणेचे लग्न झाले आहे. आई गीताबाई या हातमजूरी करतात, तर वडील सुरेश राजपूत हे बाजार समितीत बारदानचे काम करतात. एकुलता एक मुलाचा मृत्यूने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. पवनने घेतलेल्या टोकाचा निर्णयामुळे मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. पवनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास परीष जाधव करत आहेत

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.