⁠ 
रविवार, मे 19, 2024

चंद्रावर फडकावला तिरंगा!! चांद्रयान-३ ची यशस्वी लँडिंग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२३ । भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. चांद्रयान-३ ची चंद्रावर यशस्वी लँडिंग झाली असून यामुळे देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ ची यशस्वी लँडिंग झाली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सतत सावली असते. या भागात सूर्य किरण पोहोतच नाहीत. या भागात Moon Ice आणि पाणी मिळण्याची शक्यता सांगितली जातेय.

या भागात पाणी असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केलीये. या भागात १३ किलोमीटर पर्यंत Crater आहेत. Crater म्हणजे चंद्रावरचे खड्डे. चंद्रावर अनेक प्रकारचे धुमकेतू आदळून हे खड्डे तयार होता. या खड्ड्यांमुळे आकाशगंगेचा इतिहास शोधण्यास मदत होणार आहे.

दरम्यान,इस्रोचे 16,500 शास्त्रज्ञ गेल्या चार वर्षांपासून करत असलेली मेहनत पूर्ण झाली आहे. सॉफ्ट लँडिंगमध्ये तज्ञ असलेल्या जगातील चार देशांमध्ये भारताचे नाव आता सामील झाले आहे. चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगमागे शास्त्रज्ञांच्या मेहनतीसोबतच सुमारे 140 कोटी लोकांच्या प्रार्थनाही कार्यरत होत्या.