⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | गुन्हे | अत्यंत दुर्दैवी ! ठाण्यातील रुग्णालयात आणखी 17 रुग्णांचा मृत्यू

अत्यंत दुर्दैवी ! ठाण्यातील रुग्णालयात आणखी 17 रुग्णांचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२३ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आणखी 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पाच रुग्ण दगावल्याची घटना घडली असून. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

ठाण्यामधील कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्ण दगावले आहेत. या मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयात पाच रुग्ण दगावले होते. त्यानंतर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

कळवा रुग्णालयातील रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णालयाची क्षमता 1500 रुग्णांची आहे. पण रुग्णालयात रोज क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होत आहेत. पावसामुळे साथीच्या आजारामुळे ही संख्या अधिकच वाढली आहे. त्यातच डॉक्टर आणि परिचारिकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याचंही सांगण्यात येतं.मृत्यू झालेल्या 17 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.