जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२३ । जिल्ह्यासह राज्याला हादरवून सोडणारी घटना भडगाव (Bhadgaon) तालुक्यात उघडकीस आली असून एका आठ वर्षीय चिमुकलीवर लेंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेर्धात आणि संशयितास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी आज (शनिवार) भडगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळला आहे.
बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्यासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात यावा अशी मागणी हाेऊ लागली आहे.हा खटला चालवण्यासाठी उज्वल निकम यांच्या सारख्या ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करण्यात यावी. बालिकेच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत शासनाने करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
दरम्यान आज सर्व पक्षीय तसेच विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदला भडगाव तालुक्यातून प्रतिसाद मिळाला आहे. सर्व व्यवहार बंद असून नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने बंदला पाठींबा दर्शविला आहे.