⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; खाद्यतेलाच्या किंमतीत वर्षभरात ‘इतक्या’ टक्क्यांनी घसरल्या

सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; खाद्यतेलाच्या किंमतीत वर्षभरात ‘इतक्या’ टक्क्यांनी घसरल्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । कोरोना काळात सर्वच वस्तू महागल्या होत्या. त्यात खाद्यतेलाच्या किमतींनी नको तो डोंगर गाठला होता. यामुळे किचनचे बजेट अधिक कोलमडले होते. मात्र आता खाद्यतेल स्वस्त झाल्याने या महागाईत जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. वर्षभरात किंमती निच्चांकावर पोहचल्या आहेत. केंद्र सरकारने संसदेत या बदलाची माहिती दिली.

इतकी झाली घसरण
रिफाईंड सनफ्लॉवर तेल, रिफाईंड सोयाबीन, आणि रिफाईंड पॉमोलीन तेलाच्या किंमतीत एका वर्षात मोठी घसरण झाली. त्यामुळे शुद्ध सूर्यफुल तेलामध्ये 29 टक्के, शुद्ध सोयाबीन तेलाच्या किंमतीत 19 टक्के आणि पॉमोलीन तेलाच्या भावात 25 टक्क्यांची घसरण झाली. खाद्यतेल स्वस्त झाल्याने या महागाईत जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

भारत खाद्यतेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. आयातीच्या माध्यमातून भारत 60 टक्के मागणी पूर्ण करतो. कोरोना काळात तेलाचे दर गगनाला भिडले होते. त्यावेळी सोयाबीनचे एक किलो तेलाचे दर 170 ते 175 रुपयांवर गेले होते. मात्र गेल्या काही महिन्यात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण झालेली दिसून येत आहे. सध्या एक किलो तेलाचा दर आता 110 ते 115 रुपयांवर आला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने लोकसभेत खाद्यतेलाच्या स्वस्ताईविषयी लिखित निवेदन दिले. केंद्र सरकारने तेलाचे भाव नियंत्रीत ठेवण्यासाठी पाऊलं टाकल्याचं सांगण्यात आले. ग्राहक खात्याचे राज्यमंत्री निरंजन ज्योती यांनी निवेदन दिले. केंद्र सरकार गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत असल्याचा दावा करण्यात आला. जागतिक बाजारात पण खाद्य तेलाच्या किंमती उतरणीला आहेत.

भारत रिफाईंड तेलाच्या ऐवजी कच्चे सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात करतो. तरीही केंद्र सरकारने रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावरील आयात शुल्कात कपात केली आहे. या कपातीमुळे रिफाईंड खाद्यतेलावरील शुल्क कमी होऊन 13.7 टक्के झाले आहे. यामध्ये सामाजिक कल्याण सेसचा सहभाग आहे. आता मुख्य खाद्यतेलावरील शुल्क 5.5 टक्के आहे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.