⁠ 
शनिवार, मे 18, 2024

खळबळजनक : कुशीनगर एक्सप्रेसने अल्पवयीन मुलीची तस्करी करणाऱ्या महिलेला भुसावळात अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ जुलै २०२३ | अल्पवयीन मुलगी रेल्वे स्थानकावर गाडीची वाट पाहत असताना मुलीला आमिष देऊन तस्करी केल्याचा प्रकार समोर आला आहे. शबाना (वय २२ पाकरी, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) असे तस्करी करणाऱ्या महिलेचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी रेल्वे स्थानकावर गाडीची वाट पाहत असताना शबाना या महिलेने तिला मुंबई नेण्याचे आमिष दाखवले. पीडीता अल्पवयीन असल्याने तिने महिलेचा बोलण्यावर विश्वास ठेवला.

कुशीनगर एक्सप्रेसने अल्पवयीन मुलीची तस्करी करणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली आहे. अप २२५३७ कुशीनगर एक्सप्रेसच्या कोच क्रमांक बी १ मधून महिला अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तस्करी करीत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा यंत्रणेला मिळाली. तिकीट निरीक्षकाच्या सतर्कतेमुळे भुसावळ रेल्वे स्थानकात शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता ही गाडी भुसावळ स्थानकात येतात महिला व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले.

या अल्पवयीन मुलीस जळगावच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे महिलेला २८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तसेच अटक करण्यात आलेल्या महिलेवर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिसांना तपासाबाबत कोणतेही सहकार्य करीत नसल्याची, तसेच वारंवार खोटी माहिती देत असल्याचे निरीक्षक विजय घेरडे यांनी सांगितले. या प्रकरणाबाबतीत अधिक तपास लोहमार्गाच्या उपनिरीक्षक अनिता फसाटे करीत आहेत.