जळगाव जिल्हा

सुनील भंगाळे यांच्या वाहनाचा नशिराबाद पुलावर भीषण अपघात, चौघे बचावले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २२ जुलै २०२३ | नशिराबाद येथील पुलावर अपघातांचे सत्र सुरूच एकाच आठवड्यात तीन अपघात घडले आहेत. गुरुवारीच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या समय सुचकतेने तरुणाच्या प्राण वाचले होते. शनिवारी भुसावळकडून जळगावकडे येत असताना जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या चारचाकी गाडीचे टायर फुटून भीषण अपघात झाला. दैव बलवत्तर असल्याने अपघातात चारचाकीमधील चौघे बचावले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील माजी महापौर विष्णू भंगाळे यांचे बंधू जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे हे दि.२२ रोजी भुसावळकडून जळगावच्या दिशेने चारचाकी क्रमांक एमएच.१९.सीओ.८२४० ने येत असतांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीचे नशिराबाद पुलावर टायर फुटले. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी गाडी पलटी झाली. अपघात इतका भयंकर होता की वाहनाने चार वेळा पलटी घेतली. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी लागलीच धाव घेत चारचाकीतील सर्वांना बाहेर काढून जीवदान दिले आहे.

चारचाकीमध्ये सुनील भंगाळे यांच्या समवेत जळगाव जिल्हा संघटनेचे सचिव अनिल झंवर, इरफान सालार, दिनेश मालू हे देखील होते. या अपघातात कोणालाही इजा पोहचलेली नसून सर्व जण सुखरूप आहेत. ही चारचाकी जिल्हा सचिव अनिल झंवर यांची होती. सर्वांवर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button