सोन्याने गाठला पुन्हा 59 हजाराचा टप्पा, चांदीही.. वाचा ताजे दर
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२३ । सोने आणि चांदीच्या चढ-उतार सुरूच आहे. चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्यासह चांदीच्या किमतीत किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात जाण्यापूर्वी एकदा ही बातमी वाचा.
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 54,040 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 59,000 रुपये निश्चित करण्यात आला आहे. मागील काही दिवसापासून 24 कॅरेट सोन्याचा 59 हजाराच्या खाली होता.मात्र, त्यात आता वाढ झालेली दिसून येतेय. चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास जळगावात सध्या चांदीचा एक किलोचा दर 71,500 रुपयांवर आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील आजचा सोने-चांदीचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, आज मंगळवारी दुपारी 12 सोन्याचा भाव 0.03 टक्क्यांनी वाढून म्हणजे किंचित 20 रुपये आणि तो 58,709 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. याशिवाय चांदीचा भाव 169 रुपयांनी वाढून तो 71,534 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आहे.
दिवाळीत सोने आणखी महागणार आहे
दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिवाळीपर्यंत पुन्हा एकदा मोठी तेजी अपेक्षित आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 62500 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असे मानले जात आहे. ते सर्वकालीन उच्च पातळीच्या अगदी जवळ आहे. फेडरल रिझर्व्हची भूमिका थोडी नरमली तर डॉलर निर्देशांक आणि रोखे उत्पन्न कमी होईल, त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर दिसून येईल. अशा स्थितीत सोन्याचा भाव 64500 पर्यंत पोहोचू शकतो.
अॅपवरून अचूकता तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.