जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२३ । राज्यात मान्सूनने चांगलाच जोर धरला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र अद्यापही उत्तर महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने निराश केलं आहे. जुलै उजळला तरी मुसळधार पाऊस पडला नसल्याने जळगाव जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे खान्देशात आजपासून पुढील पाच दिवस उकाडा जाणवणार आहे.
मान्सून राज्यासह देशात पसरला असला तरी उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अद्यापही पाहिजे तसा प्रभाव पडला नाहीय. त्यामुळेच जुलै उजळला तरी अद्यापही मुसळधार पाऊस नाहीय. जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून हलक्या, मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असला तरी त्यात सातत्य नाहीय.
जिल्ह्यात अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्यात ओढ दिल्यानंतर आता जुलै महिन्यात पाऊस कसा राहणार याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. रोज पावसाचे ढग दाटून येत असले तरी सध्या पाऊस हुलकावणी देत असून जिल्ह्यात कधी मुसळधार पाऊस पडेल याची प्रतीक्षा शेतकरीसह सर्वसामान्य करीत आहे.
आजपासून पाच दिवस उकाडा वाढणार?
दरम्यान, मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरला होता. मात्र आज म्हणजेच 3 जुलै ते ८ जुलै दरम्यान तापमानात ३ ते ४ अंशाने वाढ होणार आहे. हवा तास पाऊस न झाल्याने उत्तर महाराष्ट्रात उकाडा वाढला असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. जळगावमध्ये रविवारी तापमानाचा पारा ३२ अंशवर होता.
जळगावातील पर्जन्यमान
दरम्यान, हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी झालेल्या पर्जन्यमान जाहीर केला,
जळगांव जिल्हा 3/07/2023
भडगाव-41
भुसावळ-1.2
पाचोरा-9
चाळीसगाव-4
धरणगाव-13