⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | हवामान | मान्सून पावसाची प्रतीक्षा संपणार? हवामान खात्याची गुडन्यूज वाचा..

मान्सून पावसाची प्रतीक्षा संपणार? हवामान खात्याची गुडन्यूज वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२३ । महाराष्ट्रात मान्सून पावसाची शेतकरीसह सर्वसामान्य जनता वाट पाहत असून आज उद्या करत तो लांबतच चालला आहे. आता मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार असून हवामान खात्याकडून मान्सून पावसाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

लवकरच कोकणातून मान्सूनची वाटचाल सुरु होणार असून येत्या ७२ तासात मुंबईत मान्सूनचे आगमन होणार आहे. यासंदर्भात मुंबई हवामान विभागाकडून माहिती देण्यात आलीय. त्यामुळे शेतकऱ्यांचाही आशा पल्लवित होणार आहे.

मे महिला उलटल्या नंतर शेतकऱ्यांसह सामान्य लोक जून महिन्यात पडणाऱ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा करतात. सर्वसाधारण मान्सून १ जूनला केरळात परंतु यंदा ८ जूनला दाखल झाला होता. त्यांनतर तीनच दिवसात म्हणजेच ११ जून रोजी राज्यातील कोकणात दाखल झाल्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता.

परंतु बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील मान्सून खोळंबला. मान्सून अजूनही सक्रीय झालेला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आता कोकणातून मान्सूनची वाटचाल सुरु होणार आहे. मुंबईत मान्सून येत्या ७२ तासांमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगतले की, अरबी समुद्रात मान्सून सक्रीय होण्याच्या द्दष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.

यामुळे रत्नागिरीत मान्सूचा थांबलेला प्रवास सुरु होणार आहे. येत्या ७२ तासांत तो मुंबईत दाखल होणार आहे. दक्षिणेत पाऊस सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. तसेच येत्या आठवड्यात उत्तर-पश्चिम भारत, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारताच्या मैदानी भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.