⁠ 
मंगळवार, जानेवारी 7, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या अमळनेरातील कुटुंबावर काळाची झडप ; तीन ठार, चार जण जखमी

गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या अमळनेरातील कुटुंबावर काळाची झडप ; तीन ठार, चार जण जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२३ । नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या अमळनेरात एका कुटुंबावर काळानं घाव घातला आहे. धुळे जिल्ह्यातील नवलनगर येथे लहान पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात अमळनेरचे तिघे ठार झाले तर चार जण जखमी झाले.

सरलाबाई पंडीत पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र पाटील (वय ५०), व शाहू विजय पाटील (वय १०, सर्व रा.अमळनेर) अशी मृतांची नावे असून या अपघातातील जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले

नेमकी घटना काय?
नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून पाटील परिवार कारने (क्र.एमएच ०४-एफझेड३६८९) अमळनेरकडे येत होता. वेगाने येणारी कार फागणे-अमळनेर रस्त्यावरील नवलनगर गावाजवळ असलेल्या एका लहान पुलावरून खाली कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला.

तर या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले आहेत. कारमध्ये जवळपास सात ते आठ जण होते. दरम्यान, ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना रूग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अनिल महाजन व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धुळे तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.