⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | गुन्हे | पोटच्या मुलांनीच संपविले बापाला, चाळीसगाव तालुक्यातील ‘त्या’ खुनाचा उलगडा

पोटच्या मुलांनीच संपविले बापाला, चाळीसगाव तालुक्यातील ‘त्या’ खुनाचा उलगडा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२३ । चाळीसगाव तालुक्यातील देवळी -चिंचखेडे शिवारात राजेंद्र सुखदेव पाटील (वय ५०) या शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. मात्र पोलिसांनी काही तासातच या खुनाचा उलगडा केला असून हा खून दोन्ही सख्या मुलांनीच केल्याचे उघड झाले आहे. जन्मदात्या बापालाच मुलांनी संपविल्याची बाब समोर येताच खळबळ उडाली आहे. मुकेश राजेंद्र पाटील (२३) व राकेश राजेंद्र पाटील (२१) अशी खून करणाऱ्या मुलांची नावे असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकी काय आहे घटना?
चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील शेतकरी राजेंद्र सुखदेव पाटील हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुलं आहे. दरम्यान, राजेंद्र पाटील हे बुधवारी रात्री शेतात झोपण्यासाठी गेले असता त्यांची अज्ञात इसमांनी हत्या केल्याचे समोर आले होते. मात्र पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केले असता खुनाचा बनाव केल्याचे दिसून आले.

त्यामुळे पोलिसांनी गावात चौकशी केली असता, मृत शेतकरी आणि त्याच्या मुलांमध्ये वाद असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी मयताच्या मुलांकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्या जबाबावमध्ये आढळून आलेली विसंगती व संशयास्पद हालचालींवरून थोरला मुलगा मुकेश (वय २३) व लहान मुलगा राकेश यांना ताब्यात घेतले.

म्ह्णून मुलांनी वडिलांना संपविले?
पोलिसांनी मुलांची कसून चौकशी केली असता आपणच वडीलांचा खून केल्याची कबुली दिली. वडिल आई व आम्हाकडून शेतामध्ये काबाडकष्ट करून घेत होते. मात्र आम्हाला घरखर्चाला पैसे देत नव्हते. तसेच आईला व शिवीगाळ करून मारहाण करत असत. दि. ८ रोजी पहाटे ३.२ सुमारास मुकेश व राकेश हे दोन्ही दुचाकीने शेतात गेले, व वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारून नंतर दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. तसेच कापूस चोरण्यासाठी अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा बनाव करून घरी जावून झोपले, अशी माहिती त्यांनी दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.