⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

बाबो..! गिरणा धरणाच्या जलसाठ्यात मोठी घट ; सद्य:स्थितीत ‘इतकेच’ टक्के जलसाठा शिल्लक..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२३ । यंदा तब्बल आठवड्याभराच्या विलंबनानंतर अखेर मान्सून केरळात दाखल झाला असून त्याचा पुढील प्रवास सुरु आहे. महाराष्ट्रात अद्यापही मान्सून दाखल झालेला नसला तरी त्यापूर्वी राज्यातील काही ठिकाणी पाणीटंचाईचे चटके अधिक तीव्र होऊ लागले आहेत. दरम्यान, जळगाव ग्रामीण, पाचोरा, भडगाव, चाळीसगावसह इतर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणातील जलसाठा कमी झाल्याने पाणीटंचाईचे सावट ओढवण्याची शक्यता आहे.

गिरणा धरणात सद्य:स्थितीत २३, तर मन्याडमध्ये १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यंदा मान्सून केरळात उशिरा दाखल झाल्याने महाराष्ट्रातील आगमन लांबले आहे. यामुळे शेतकरीही चिंतातुर झाले असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांची भटकंती वाढली आहे.

गिरणा धरणात २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवनही वेळापत्रक कोलमडल्यास बागायती कपाशीच्या लागवडीवरही शेतकरी आहेत. मन्याड पट्ट्यातील २२ गावांसाठी वरदान ठरणारे मन्याड धरण गत पावसाळ्यात शंभर टक्के भरले होते. मात्र, सद्य:स्थितीत धरणात केवळ १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

तालुक्यातील १४ लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. विहिरींनी तळ गाठला असून, पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटू लागले आहेत. गिरणा धरण हे २१५० कोटी घनफूट साठवण क्षमतेचे आहे. ३,००० दशलक्ष घनफूट असून उपयुक्त जलसाठा १८.५०० दशलक्ष घनफूट आहे.

धरणावर १५८ ग्रामीण व पालिकेच्या ४ पाणीपुरवठा योजना अवलंबून असून गेल्या वर्षीदेखील धरणात ८ जून अखेर २३ टक्के जलसाठा होता. यंदाही हा साठा एवढाच आहे.