⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

पोहोण्याचा मोह जीवावर बेतला ; भुसावळातील दोघे तरुण तापी नदीपात्रात बुडाले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२३ । भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील तापी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सायंकाळी घडलीय. शेख दानीश शेख जाबीर (17, रा.ग्रीन पार्क, 32 खोली, भुसावळ) व अंकुश दौलत ठाकूर (17, ग्रीन पार्क, 32 खोली, भुसावळ) अशी मृतांची नावे असून या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी काय आहे घटना?
सध्या उकाड्या प्रचंड वाढला असून अनेक जण तापी नदीपात्रात पोहण्यासाठी जात असतात. यातच नदीपात्रातील इंजिन घाट या बंधार्‍यावर तर दररोज शेकडो तरूणांची पोहण्यासाठी गर्दी होत असते. इंजिन घाटाच्या पुढे असलेल्या नदीवरील जुन्या पुलाच्या भागात देखील पाण्याचा साठा असल्याने येथेही तरूण पोहायला जातात.

दरम्यान, आज सायंकाळी शहरातील खडका रोड भागातील काही तरूण हे तापी नदीच्या पात्रात लहान पुलाजवळच्या भागात पोहण्यासाठी गेले होते. यात नदीच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे अंकुश ठाकूर आणि शेख दानीश हे दोन तरूण बुडाले असून तीन जणांना मात्र वाचविण्यात यश आले आहे. ही दुर्घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली

पट्टीच्या पोहणार्‍यांना मयत युवकांचा मृतदेह बाहेर काढला. तरुणांना डॉ.राजेश मानवतकर यांच्याकडे हलवले असता त्यांनी तपासून मृत घोषित केले. दोघा तरुणांचे मृतदेह ट्रामा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. कुटूंबियांना तरुण मुलांचा मृत्यूची वार्ता कळताच मोठा धक्का बसला. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली.