पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर लावताच लागला शॉक ; १४ वर्षीय मुस्कानचा दुर्दैवी मृत्यू

मे 12, 2023 9:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर लावत असताना विजेचा धक्का लागल्याने १४ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील कोळवद येथे घडली. मुस्कान संजय तडवी (वय १४) असं मृत मुलीचे नाव असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

shock jpg webp

नेमकी काय आहे घटना?
कोळवद या गावात राहणारे संजय बिस्मिल्ला तडवी यांची मुस्कान तडवी ही अल्पवयीन मुलगी आज शुक्रवार १२ मे रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान आपल्या घरातील पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर लावत असताना मोटारीत विजेचा प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुस्कान हिला विजेचा धक्का लागल्याने तिच्या कुटुंबाने गावातील मंडळीच्या मदतीने तात्काळ तिला यावल येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणाले असता तिला वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयत मुस्कान तडवी ही अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातील संजय बिस्मिल्ला तडवी यांच्या कुटुंबातील मुलगी होती. तिच्या अशा अपघाती मृत्यु झाल्याने गावात सर्वत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर या मरण पावलेल्या चिमकुलीच्या आदीवासी कुटुंबास शासनाकडून काहीतरी मदत मिळाल्यास कुटुंबाला हातभार लागेल अशी अपेक्षा परिसरातील आदीवासी बांधवांकडुन व्यक्त करण्यात येत आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now