⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | गुन्हे | विहिरीतून येत होता दुर्गंधी वास, डोकावून पाहताच.. यावल तालुक्यातील धक्कादायक घटना

विहिरीतून येत होता दुर्गंधी वास, डोकावून पाहताच.. यावल तालुक्यातील धक्कादायक घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । यावल तालुक्यातील मोर धरण परिसरातील शेती शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. महिलेची अद्यापही ओळख पटू शकली नसून महिलेच्या हातावरती सखाराम सुभाष असे नाव गोंदलेले आहे.

नेमकी काय आहे घटना
यावल तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोर धरण परिसरातील शेती शिवारात असलेल्या गट नंबर १२०३ या शेत मजूर काम करण्यासाठी गेले असता विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे मजुरांनी विहिरीत डोकावून पाहिले असता मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

याबाबतची माहिती शेतात काम करणाऱ्या मजुरांनी शेतमालकाला कळविले व शेतमालकाने सदर हिंगोणा गावातील पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांना फोन द्वारे माहिती दिली. यानंतर पोलीस पाटलांनी घटनेची माहीती फैजपूर पोलीस ठाण्यात दिली.

फैजपूर येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पाणबुड्याच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदन देखील घटनास्थळीच करण्यात आले. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने व अनोळखी महिलेच्या असून महिलेची ओळख पटू शकली नाही. महिलेचे वय अंदाजे ४४ वर्ष असून तिच्या हातावरती सखाराम सुभाष असे नाव गोंदलेले आहे. फैजपूर पोलीसांकडून सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक देविदास सूरदास हे पुढील तपास करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.