हवामान

अरे देवा..! अवकाळीनंतर आता चक्रीवादळाचं संकट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२३ । महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले आहे. या अवकाळीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान अशातच आता बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या चक्रीवादळाला मोचा या नावाने ओळखले जाणार आहे.

बंगालच्या उपसागरात मान्सून पूर्व तयार होणारं हे पहिलंच चक्रीवादळ राहणार असल्यामुळे देशातील बहुतांशी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यूएस ग्लोबल फोरकास्ट सिस्टमनं या चक्रीवादळाचा अंदाज वर्तवला होता. 

बंगालच्या उपसागरात 5 ते 11 मे दरम्यान या चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे या गोष्टीला भारतीय हवामान विभागाने देखील दुजोरा दिला आहे.

काही मॉडेल्समध्ये डिप्रेशनचे पुढे चक्रीवादळात निर्मिती होत असल्याचं दिसत असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात असणाऱ्या घडामोडींवर नजर ठेऊन असल्याची माहिती आयएमडीच्या वतीनं देण्यात आली आहे. यादरम्यान बांगलादेशच्या किनारपट्टीवर 150 ते 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आधीच गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता या मोचा चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात धोक्याची घंटा वाजली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button