जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२३ । शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर झाल्यानंतर अनेक जण मुलांना घेऊन बाहेर गावी जाण्याचा प्लॅन करतात. तसेच काही जण फिरण्याचा प्लॅन करतात. यादरम्यान, रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येतेय. दरम्यान, यातच प्रवाशांची वाढती संख्या लक्ष्यात घेऊन मध्य रेल्वेकडून अनेक विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जात असून यातच पुणे ते अजनी अशी एकेरी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
01443 क्रमांकाची ही ट्रेन 23 एप्रिल 2023 रोजी पुणे जंक्शनवरून 22.00 वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ती 12.50 वाजता अजनी येथे पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
या स्टेशनवर थांबा?
ही गाडी दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा या मार्गावरील स्थानकांवर थांबेल. त्याच्या संरचनेत दोन एसी-3 टायर कोच, नऊ स्लीपर क्लास कोच, नऊ जनरल सेकंड क्लास कोच आणि दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.
विशेष ट्रेनसाठी बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर आज 22 एप्रिल 2023 पासून विशेष शुल्कावर करता येईल. थांब्यांच्या वेळेच्या विशिष्ट तपशीलांसाठी, प्रवाशांना enquiry.indianrail.gov.in वर भेट देण्याचा किंवा NTES अॅप डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जातो.
स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, प्रवाशांना COVID-योग्य वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन केले जाते.