⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | लाचखोर पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ ।दाखल गुन्ह्यात अनुकूल आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या धरणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला आज लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले. नाईक विलास सोनावणे ( बक्कल नं.२७८६ , रा.अमळनेर ) असे या आरोपी पोलिसांचे नाव आहे. 

 

धरणगाव तालुक्यातील बांभोरी बु येथील ४८ वर्षीय तक्रारदाराने  ही लाचेची मागणी होत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली होती. पोलीस नाईक सोनावणेयांनी  ६ मार्चरोजी तक्रारदाराकडे या रकमेची मागणी केली होती.

 

तक्रारदार यांच्या विरूध्द धरणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या भादवि कलम- ४२० च्या गुन्ह्याचा तपास आलोसे यांचेकडे असुन गुन्ह्याचे अनुकूल चार्जशीट न्यायालयात पाठविण्याच्या मोबादल्यात आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे 19,000/- रूपयांची लाचेची मागणी केली व तक्रारदाराकडे असलेले डिव्हाइस हिसकावून नेले म्हणुन अमळनेर पोलीस स्टेशन गु.र.नं.११९/२०२१ भ्र.प्र.अ.-कलम-७ सह कलम-३९२, २०१, १८६ भादवि अन्वये आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या या  सापळा पथकात उप अधीक्षक   गोपाल ठाकुर, पोलीस निरीक्षक . निलेश लोधी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर.   यांचा समावेश होता नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक   सुनील कडासने , अपर पोलीस अधीक्षक  निलेश सोनवणे,पोलीस उपअधीक्षक .विजय जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला  होता

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.