⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावसाठी आलेले कोट्यवधी रुपये महापालिका घालतेय खड्ड्यात; जाणून घ्या कसे?

जळगावसाठी आलेले कोट्यवधी रुपये महापालिका घालतेय खड्ड्यात; जाणून घ्या कसे?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १४ एप्रिल २०२३ | जळगाव शहरात गेल्या सात ते आठ वर्षांपासून रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली होती. आता जळगावकरांच्या संतापाचा उद्रेक होवू लागल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० कोटींच्या निधीपैकी ४२ कोटींच्या निधीसून रस्त्यांची कामे मार्गी लागली. मात्र शहरातील प्रमुख रस्ते या निधीतून होत असताना, तयार रस्त्यांवर काही ना काही काम काढून महापालिकेकडून खोदकाम सुरू आहे. कधी चेंबरच्या नावाखाली, कधी गटार, तर कधी अमृतच्या जलवाहिनीच्या नावाखाली सातत्याने खोदकाम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू झाले, की महापालिकेची यंत्रणा पाठोपाठ रस्ता खोदून ठेवते. या विषयावर जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी परखड भाष्य केलं आहे. जळगाव लाईव्हच्या वाचकांसाठी दिलीप तिवारी यांचा ‘डांबरीकरण केलेले रस्ते ५५ ठिकाणी खोदले!’ लेख जसाच्या तसा…

अंधेर नगरी चौपट राजा – ४
डांबरीकरण केलेले रस्ते ५५ ठिकाणी खोदले !

ठेकेदाराकडून B & C ला २२ पत्रे | काही कामे MPM करून रोखली | ठेकेदाराने ‘दोष दायित्व’ नाकारले

जळगाव शहरातील ४२ रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा विषय सध्या चर्चेत आहे. नगर विकास विभागाने अनंत अटी लादून वर्षभरात कानपूरचा करायला सक्ती केली आहे. दुसरीकडे शहरात ४९ रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. या कामांचे सर्व नियंत्रण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंतांकडे आहे. त्यांचे उपविभागीय अधिकारी ठेकेदाराला काम वेळेत पूर्ण करण्यासाठी वारंवार सूचना देत आहेत. ठेकेदारानेही तांत्रिक कामांचे WBM, MPM आणि BM हे टप्पे पूर्ण करीत आणले आहे. मात्र या रस्ते डांबरीकरण कामात मनपाचा सफाई, आरोग्य व पाणी पुरवठा विभाग ऐनकेन प्रकारे अडथळे आणत आहेत.

रस्ते डांबरीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी अमृत पाणी योजना व अमृत भुयारी गटार योजनेचे कामे पूर्ण करणे ही मनपाची जबाबदारी आहे. या कामांचा संबंध सफाई, आरोग्य व पाणी पुरवठा विभागाशी आहे. मात्र या तीनही विभागांचा आपापसात समन्वय नाही. त्यामुळे काँक्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदाराला पुरेशी माहिती दिली जात नाही. शेवटी B & C कडून रस्त्याचे डांबरीकरण करायला ना हरकत प्रमाणपत्र ठेकेदाराला दिले जाते. त्या पत्राच्या भरवशावर रस्त्यांचे तांत्रिक काम WBM, MPM प्रकारात पूर्ण होत येते. तेव्हा मध्येच केव्हातरी अमृत पाणी योजना किंवा अमृत भुयारी गटार योजनेसाठी खोदकाम केले जाते.

नवे डांबरीकरण खोदायला सर्रास जेसीबीचा वापर केला जातो. जेसीबीच्या दणक्याने रस्त्यांचे आणखी नुकसान होते. या प्रकाराविषयी ठेकेदाराने आक्षेप घेणारी २२ पत्रे, खोदाई केलेल्या कामांच्या छायाचित्रासह B & C कडे वेळोवेळी दि. २१ जुलै २०२२ ते दि. ११ एप्रिल २०२३ दरम्यान दिली आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारावर असलेली ‘दोष दायित्व जबाबदारी’ (Defect Liabelity) नाकारणारा इशारा ठेकेदाराने दिला आहे. यावर ना B & C ने उत्तर दिले, ना मनपाने कामात सुधारणा केली. या शिवाय काही रस्त्यांचे कार्पेट व सील कोटचे काम स्थगित केले आहे. ते कशासाठी ? याचाही खुलासा झालेला नाही.

सर्वाधिक अडचणीच्या अशी की, अमृत पाणी योजना व अमृत भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण करण्यापूर्वीच आराखडे तयार आहेत. पण काम केल्यानंतरच आराखडे फायनल केलेले नाहीत. काही कामांमध्ये ऐनवेळी बदल होतात. त्यामुळे स्पॉटवर बदल केलेले नकाशे अपडेट हवेत. डांबरीकरण कामाची खोदाई न करता ग्रू कटींग मशीन वापरून काम करायला हवे. तसे होत नाही. खोदाईला सरसकट जेसीबी वापरले जाते. ते जास्त नुकसान करते.

डांबरीकरण केलेले काम खोदले की तेथील खड्डा बुजवायला पॅच वर्क केले जाते. ते काम मूळ कामासारखे होत नाही. अशा ठिकाणी पाऊस, सांडपाणी, अती अवजड वाहने यामुळे लवकर खड्डे पडू शकतात. असे प्रकार झाले की ठेकेदाराने दर्जाहीन काम केल्याची बोंब नागरिक मारतात. मात्र B & C व मनपाचे अधिकारी किती वेळ काढूपणा करतात हे नागरिकांना समजत नाही. जळगाव शहरातील रस्ते डांबरीकरणाची जी दुर्लक्षित अवस्था आज आहे त्यापेक्षाही दुर्गती रस्ते काँक्रिटीकरणाची होईल. म्हणूनच नागरिकांनी काँक्रिटीकरणाला विरोधाची भूमिका घ्यायला हवी.

लेखाशी संबंधित तांत्रिक माहिती …
WBM – मुरूम व जाड खडीचा थर टाकून डांबरीकरणाचा पाया तयार करणे.
MPM – ३ टक्के डांबराचा स्प्रे मारून त्यावर ४० MM खडी टाकणे. पुन्हा डांबराचा स्प्रे करून त्यावर १० MM खडीची रोलरने दबाई करणे
BM – ५० MM खडीचा थर पवारने अंथरणे, त्यावर ६ MM, १० MM खडी टाकून रोलरने दबाई करणे
कार्पेट – २५ MM खडी पेव्हर पसरून त्यावर जास्त प्रमाणात डांबर फवारणे.
सिलकोट – चूना वा पावडर टाकून पृष्ठभाग तयार करणे.

-जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी

author avatar
दिलीप तिवारी
जेष्ठ पत्रकार आणि आपल्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध