जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. सारस्वत सहकारी बँकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. याबाबतची अधिसूचना देखील जारी झालेली आहे. Saraswat Bank Recruitment
त्यानुसार पदवी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी www.saraswatbank.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 08 एप्रिल 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीचा तपशील जाणूनच अर्ज करावा. Saraswat Bank Bharti
किती पदे रिक्त आहेत?
या भरती अंतर्गत 150 पदे भरली जाणार आहे.
या पदांसाठी होणार भरती?
ही भरती कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) या पदासाठी केली जाणार आहे.
काय आहे शैक्षणिक पात्रता :
उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
बँक/NBFC/विमा कंपन्या/बँकेच्या कोणत्याही उप कंपनीमध्ये किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
वय मर्यादा – 1 मार्च 2023 रोजी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा जास्त नसावी.
परीक्षा फी – रु. 750/- (Saraswat Bank Recruitment)
मिळणारे वेतन – रु. 2,44,343/- ते रु. 4,83,520 वार्षिक
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY