कृषीजळगाव जिल्हाहवामान

हवामान खात्याचा अंदाज ठरतोय खरा..! जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना पुढचे काही तास महत्त्वाचे, असा असेल अंदाज?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १६ मार्च २०२३ | हवामान खात्याने अवकाळी पावसाबद्दल वर्तविलेला अंदाज खरा ठरताना दिसतोय. हवामान खात्याने दिनांक 15 ते 17 मार्च दरम्यान राज्यातील जळगाव जिल्ह्यासह अनेक भागात वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.

त्यानंतर रात्री जिल्ह्यातील अनेक काही तालुक्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता शेतकऱ्यांचे उरलेलं पीकही हातातून जाण्याच्या शक्यता आहे. कारण आज गुरुवार राज्यातील जळगावसह जवळपास 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
राज्यात जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील जवळपास 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यात जळगावसह छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान रात्री जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यासह यावल मुक्ताईनगर परिसरासह इतर ठिकाणी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा मका, गहू, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

जिल्ह्यातील तापमानात घट
दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अवकाळी पावसाच्या ढगांमुळे‎ जिल्ह्यात तापमान व उन्हाची तीव्रता‎ घटली आहे. आर्द्रता वाढल्याने‎ उकाडा मात्र कायम आहे. बुधवारी‎ जिल्ह्यात कमाल तापमान ३४.८ अंश‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सेल्सिअस तर किमान तापमान १५.८‎ अंश सेल्सिअसवर हाेते. मार्च‎ महिन्यातील पहिला पंधरवडा ढगांच्या‎ छायेत गेल्याने मार्चहीटची तीव्रता‎ कमी झाली हाेती. पुढील आणखी ५‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दिवस राज्यावर ढगांची छाया कायम‎ राहणार आहे. त्यामुळे तापमान मार्च‎ महिन्यातील सरासरीपेक्षा ४ ते ५ अंश‎ सेल्सिअसने कमी राहणार असल्याचे‎ हवामान खात्याचे म्हणणे आहे.‎

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button