जळगाव जिल्हाराजकारण

..म्हणून मी उद्धव ठाकरेंना सोडून गेलो, गुलाबराव पाटलांचा पुन्हा पुनरुच्चार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | १२ मार्च २०२३ | शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा ठाकरे जोरदार टीका केली आहे. मागच्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंमुळे विकास झाला नसल्याचे खापर गुलाबराव पाटील यांनी फोडले आहे. तसेच ठाकरेंना का सोडून गेले याचे पुनरुच्चार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पुन्हा एकदा केला. Gulabrao Patil slam Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये जलद गतीने कामे करू शकलो नाही. उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात सगळेच लॉकडाऊन व स्वतः उद्धव ठाकरे लॉकडाऊन होते. मात्र आता मूळ कामे सुरू झाली असून स्वातंत्र्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री सात महिन्यात पाच वेळा जळगाव जिल्ह्यात येणारी एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

आपल्यातला एक मराठा चेहरा आपल्यापासून लांब जात आहे. तो जाता कामा नये हे उद्धव ठाकरेंना समजावलं होतं. उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना त्यांना हात पाय जोडून विनंती केली होती. नागपूरपासून तर दादरपर्यंत सर्व गेले त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदार संघात विकास करू शकलो नसतो. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना सोडून गेलो असा पुनरुच्चार पुन्हा एकदा मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगाव मधील एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button