जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२३ । तुमचाही लग्नाच्या हंगामात सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सराफा बाजारात सोने (Gold Rate) चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. तरी पण उच्चांकापासून आज तुम्हाला 3000 रुपयांहुन अधिक स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी आहे. Gold Silver Rate Today
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 11 वाजेपर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या दरात किंचित घसरण दिसून आलीय. आज सोन्याच्या किमतीत 55 रुपयाची घसरण दिसून येत असून यामुळे सोने 55,775 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. सोबतच आज चांदीच्या किमतीत 415 घसरण झाली असून यामुळे चांदी 63,520 प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
दरम्यान, गेल्या फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात मोठी तेजी आली होती. ऐन लग्नसराईत सोन्याने मारलेल्या उसळीने सर्वांनाच घाम फुटला होता. त्यावेळीस मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव जवळपास 58,800 हजार रुपयावर गेला होता. मात्र, महिनाभरात त्यात मोठी घट झाली आहे. म्हणजे काय तर महिनाभरात सोन्याचा भाव जवळपास 3 हजार रुपयांनी कमी झाला आहे.
जळगावातील सोने चांदीचा दर?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,100 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर दुसरीकडे चांदी 66,000 रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, गेल्या महिन्यातील 2 फेब्रुवारीला जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 58,300 विना जीएसटीसह (GST सह जवळपास 59500) विक्रमी पातळीवर गेला होता. मात्र त्यात आतापर्यंत मोठी घसरण दिसून येतेय. म्हणजेच काय तर गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात जवळपास 3 हजार 700 हजार रुपयांची (GST सह) घसरण झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोने खरेदी करण्याची मोठी संधी आहे.
दुसरीकडे चांदीबद्दल बोलायचे झाले तर 2 फेब्रुवारी 2023 रोजी चांदी चांदी 68,000 हजार विना जीएसटीस (GST सह जवळपास 71000 हजार) इतका होता. त्यात आता मोठी घसरण झाली. म्हणजे काय तर महिनाभरात चांदीचा भाव जवळपास 5 हजार रुपयांनी (GST सह) कमी झाला आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)