⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | ट्रॅक्टर मोटरसायकलच्या भीषण अपघातात दोन युवक ठार

ट्रॅक्टर मोटरसायकलच्या भीषण अपघातात दोन युवक ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । सावदा येथून जवळ असलेल्या सावखेडा येथे दि. ९ मे रोजी रात्री गौरखेडा – कुंभारखेडा फाटा या रस्त्यावर सुसाट वेगाने वाहतूक करणारे ट्रॅक्टर व मोटरसायकल यांची धडक होऊन मोटारसायकलस्वार दोन इसम ठार झाल्याची घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की मोटार सायकल स्वाराचा एक हात तुटून आठ ते दहा फुटापर्यंत तुटलेला हात फेकला गेलेला होता. याबाबत सावदा पोलिस स्टेशनला ट्रॅक्टर चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रानुसार सविस्तर वृत्त असे की, कुंभारखेडा फाट्यावरून राजू रमजान तडवी हे लोहारा गावाकडे मोटारसायकल वरून जात असताना गौरखेडा येथील युनूस समशेर तडवी यांने हात देऊन गाडी थांबवली व तोही त्या गाडीवर डबल सीट बसून ते गौरखेडा लोहारा रस्त्याने मोटारसायकल ने जाऊ लागले, थोड्या अंतरावर गेल्यानंतर समोरून सुसाट वेगाने येणाऱ्या स्वराज कंपनीच्या विना नंबर  ट्रॅक्टर ने मोटर सायकल ला जोरदार धडक दिली.

मयत राजू तडवी यांच्या मालकीची हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटर सायकल नंबर नसलेल्या गाडीचा अपघातात चूराळा झाला. आणि हा भीषण अपघात झाला. धडक एवढी जोरदार होती की मोटर सायकल स्वार लोहारा येथील राजू तडवी यांचा एक हात शरीरापासून वेगळा होऊन ८ ते १० फूट अंतरावर फेकला गेला. व दुसरा मोटर सायकल स्वाराच्या मागे बसलेला गौरखेडा येथील युनूस समशेर तडवी वय ३४ वर्ष हे पण आठ ते दहा फूट अंतरावर फेकले गेले.

लगेचच त्यांना फैजपूर येथील डॉक्टर खाचणे यांच्याकडे पुढील उपचाराकरता नेण्यात  आले. व तेथून पुढील उपचाराकरता भुसावळ येथे नेत असताना वाटेतच युनुस तडवी यांचा मृत्यू झाला व काही वेळाने राजू तडवी यांचा पण मृत्यू झाला. ही बातमी गावात पसरताच गौरखेडा व लोहारा गावावर शोककळा पसरली. अपघात घडताच ट्रॅक्टर चालक विजय प्रेम सिंग राठोड रा.लोहारा  ता. रावेर यांनी स्वतः पोलीस स्टेशनला येऊन घटनेची माहिती दिली व स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले व ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले.येन रमजान महिन्यामध्ये तडवी समाजाच्या या दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या  कुटुंबियांवर व गावावर एक मोठा आघात  झाला आहे.हे दोघे तरुण घरातील कमावते सदस्य असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.

सावदा पोलिस स्टेशनला  मूशीर रमजान तडवी रा. लोहारा ता रावेर यांच्या फिर्यादीवरून गुरन- ५६/२०२१ भादवी क.३०४( अ),२७९,३३७,३३८मो.व्हे.का. क.१८४,१३४ (अ)(ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. अपघातातील लोहारा ता रावेर येथील मयत राजू रमजान तडवी (वय ४९ )हे घरातील एकटेच कमावते  पुरुष असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर एक प्रकारे आघातच झालेला असून ते लोहारा येथील प्रगतशील शेतकरी तसेच आदिवासी विकास सोसायटीचे माजी चेअरमन होते.त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

अपघातातील दुसरे मयत युनुस समशेर तडवी (वय ३४) हे पण घरातील कमावते व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात बसला आहे. ते गौरखेडा येथील माजी सरपंच समशेर तडवी, यांचे  मोठे सुपुत्र असून त्यांच्या पश्चात तीन भाऊ, एक बहीण ,आई-वडील असा परिवार आहे.

परिसरात सदर भीषण अपघाताची बातमी लगेच पसरली.भीषण अपघाताची माहिती सावदा पोलिस स्टेशन चे सपोनि देविदास इंगोले यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.सदर मयताचे पोस्टमार्टम  करण्यासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात तात्काळ पाठवून ते मृतदेह सदर मयताच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी देण्यात आले,

पुढिल तपास सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डीडी इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार , पोलीस कॉन्स्टेबल युसुफ तडवी, मेहरबान तडवी, व सहकारी करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.