⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | आनंदाची बातमी! आठवड्याच्या पहिल्याच सोने-चांदी घसरली, पहा काय आहे नवीन दर?

आनंदाची बातमी! आठवड्याच्या पहिल्याच सोने-चांदी घसरली, पहा काय आहे नवीन दर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२३ । तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या व्यावसायिक आठवड्यात सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण दिसून आलीय. अशातच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवसाच्या सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदी देखील घसरली आहे. Gold Silver Rate Today

आजचा काय आहे दर
आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट सोन्याचा दर किंचित 50 रुपयांनी घसरली असून 56,693 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. सोबतच चांदी 480 रुपायांनी घसरली असून 66,182 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

डिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार गेल्या व्यावसायिक आठवड्यात सोन्याचा भाव 438 रुपयांनी घसरला आहे. त्याचवेळी चांदीच्या दरात 326 रुपयांची घसरण झाली आहे. उल्लेखनीय आहे की IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA द्वारे जारी केलेले दर देशभरात सामान्य आहेत परंतु त्यांच्या किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपच्या माध्यमातून सोन्याची शुद्धता तर तपासाच पण त्यासंबंधित कोणतीही तक्रार तुम्ही करू शकता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.