⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | अंबे वडगाव येथील पी.सी.के.कॉटन जिनिंगच्या ढेप गोडाऊनला भीषण आग ; ६० लाखाचे नुकसान

अंबे वडगाव येथील पी.सी.के.कॉटन जिनिंगच्या ढेप गोडाऊनला भीषण आग ; ६० लाखाचे नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव  पी.सी.के.कॉटन जिनिंगच्या ढेप गोडाऊनला भीषण आग लागून आगीत अंदाजे साठलाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पी.सी.के.कॉटन जिनिंगमध्ये ढेपच्या गोडाऊनमध्ये चार हजार ढेपची पोती भरलेले होती. परंतु आज सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास या गोडाऊनमधुन धुरांचे लोट निघत असतांना दिसू लागले व आग लागल्याचे लक्षात येताच या परिस्थीतीची दखल घेत लगेचच जिनिंगच्या संचालकांनी पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला कळवले असता पाचोरा नगरपालिकेचा अग्निशामक बंब त्वरित आला व आग विझवण्याचे काम सुरु झाले. तसेच ग्रामस्थांनी जिनिंगकडे धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. परंतु तेलयूक्त ढेप असल्याने आग भडकली सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान लागलेली आग विझवण्यासाठी सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रयत्न सुरु होते.

 

या ठिकाणी चारहजार ढेपची पोती ठेवण्यात आलेली होती अशी माहिती मिळाली असून, ही आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर ढेप जळाली तसेच आग विझविण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागल्याने संपूर्ण ढेप पाण्यात भिजल्याने तसेच ढेपची पोती आगीतून वाचवण्यासाठी जलद गतीने जेसीबीच्या साह्याने बाहेर काढावी लागल्याने जवळपास साठलाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वरचे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थीतीची पहाणी केली असल्याचे समजते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.