जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । सोने आणि चांदीच्या किमतीत सुरु असलेली दरवाढ सुरूच आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोने 0.16 टक्क्याने वाढले आहे. सोबतच चांदी 0.62 टक्क्यांनी महागली आहे. दरम्यान, सततच्या दरवाढीने सोन्याच्या किंमतीने (Gold Price) अडीच वर्षाचा रेकॉड मोडत नवीन रेकॉर्ड तयार केला. Gold Silver Rate Today
MCX वरील सोने-चांदीचा भाव?
आज बुधवारी सोन्याने MCX वर सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढला असून त्यामुळे आता 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,750 रुपयांवर व्यवहार करत आहे. यापूर्वी शुक्रवारी 57050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. तर दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येतेय. आज चांदी प्रति किलो 422 रुपयांनी वाढून 68,969 रुपयावर व्यवहार करत आहे.
जळगावातील दर
जळगावात सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52 हजार रुपयांवर गेला आहे. . तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव अंदाजित 57 हजार 400 रुपये इतका आहे.
सोन्याच्या किमतीने अडीच वर्षाचा रेकॉर्ड मोडला
दरम्यान, सोन्याच्या किमतीने अडीच वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. यापूर्वी कोरोना लॉकडाऊन दरम्यान, ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 56,200 रुपयांवर गेला होता. त्यानंतर आता सोने तब्बल 57 हजारावर गेला आहे. दरम्यान, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेसह अनेक विकसीत देशांना मंदीची भीती सतावत आहे. चीनमधील कोरोनाची अपडेट, रशिया आणि युक्रेन दरम्यानचे युद्ध यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. परिणामी येत्या काही दिवसात सोने रेकॉर्ड ब्रेक करेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आगामी काही दिवसात सोन्याचा भाव 60 हजार रुपयांवर जाणार असल्याचे मत तज्ज्ञांनी वर्तविला आहे.