जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२३ । वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झालेली असतानाच महागाईच्या आघाडीवर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवसात खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झालेली आहे. दिल्ली तेल-तेलबिया बाजारात बुधवारी जवळपास सर्व खाद्यतेल आणि तेलबियांच्या किमती घसरल्या. दुसरीकडे, ‘शॉर्ट सप्लाय’मुळे सोयाबीन तेलाचे दर पूर्वीच्या पातळीवरच राहिले. Edible oil prices fell
जळगावात काय आहे तेलाचा भाव ?
गेल्या काही दिवसापूर्वीच सोयाबीन तेलाचे 900 MLचे पाऊच 135 ते 138 रुपयापर्यंत गेले होते. मात्र आता झालेल्या घसरणीनंतर तेलाचे 900 MLचे पाऊच 127 ते 129 रुपयांवर आले आहे. तर खुले एक किलो सोयाबीन तेलाचा दर जवळपास 141 ते 144 रुपये इतका आहे. घाऊक बाजारपेठेत 15 किलो सोयाबीन तेलाच्या डब्याचे दर 2150 खाली आले. दुसरीकडे 15 किलो शेंगदाणा तेलाचा दर 3030 रुपयावर आला आहे.
किंबहुना, परदेशी बाजारातील घसरणीच्या प्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली तेल-तेलबिया बाजारात बुधवारी जवळपास सर्व खाद्यतेल आणि तेलबियांच्या किमती घसरल्या. परंतु आयात तेलाच्या किमती निम्म्याहून कमी झाल्या आहेत, मात्र कमाल किरकोळ किंमतीमुळे (एमआरपी) ग्राहकांना या घसरणीचा लाभही मिळत नाही.
शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे
दुसरीकडे, कोटा पद्धतीनुसार आयात शुल्कमुक्त तेलाच्या कमी किमतीमुळे देशांतर्गत तेल-तेलबियांवर इतका ताण आला आहे की, सोयाबीननंतर येणारे मोहरीचे पीक घेण्याबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.