जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी दिवसेंदिवस कमी होत असतानाच आज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. आज ८६१ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर ८०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.
जळगाव जिल्ह्यात मे महिन्याची सुरवात कोरोना संसर्गाच्या बाबतीत सुखावह झाली आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, आज बाधित रुग्ण अधिक आढळून आले आहे. आज ८०८ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित झालेल्या १ लाख २८ हजार १७२ रुग्णांपैकी १ लाख १६ हजार २७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र जिल्ह्यात मृत्यू सत्र सुरूच आहे. आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मृताचा आकडा २३०४ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या ९५९४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९०.७२ टक्क्यांवर पोहचले आहे.
जळगाव शहर १२७, जळगाव ग्रामीण ३२, भुसावळ १०६, अमळनेर ३६, चोपडा ४७, पाचोरा २८, भडगाव ०७, धरणगाव १५, यावल २४, एरंडोल २४, जामनेर १०५, रावेर ७०, पारोळा ३५, चाळीसगाव ६७, मुक्ताईनगर ८१, बोदवड ३६, अन्य जिल्ह्यातील २१.