जळगाव जिल्हा

लव जिहाद व धर्मांतर विषयी कुंभमेळ्यात जागरण होणार; सर्वांनी सहभाग घ्यावा – जितेंद्र महाराज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात गोद्री येथे दिनांक 25 जानेवारी ते 30 जानेवारी 2023 दरम्यान अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा लबाना व नायकडा समाज कुंभ होणार असून या कुंभासाठी सहपरिवार सहभागी होण्याचे आवाहन पोहरादेवी येथील जितेंद्र महाराज यांनी केले.

गोद्री येथे होणारा कुंभ मेळावा संपूर्ण भारतातील गोरबंजारा व लवाना नायकडा समाजाच्या विकासासाठी व उत्थानासाठी होत आहे. त्यामुळे प्रत्येक समाज घटकाची उपस्थिती तेथे राहायला हवी. त्या ठिकाणी कृष्णलीला, संत सेवालाल महाराज जीवनचरित्र, संत रामराव महाराज जीवनचरित्र, तसेच बंजारा संस्कृतीचे दर्शन दाखवण्यात येईल.

गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाज बांधवांना विविध आमिष दाखवून ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून धर्मांतरित करण्यात येत आहे. तसेच महिला व तरुणींना लव जिहादच्या जाळ्यात फसवून अपहरण करण्यात येत आहे. या सर्व समस्यांचे जागरण या कुंभामध्ये होईल. त्यासाठी आपला सहभाग आवश्यक आहे. सर्वांनी यावे. असे आवाहन जितेंद्र महाराजांनी सर्व समाज बांधवांना केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button