⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | आज गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय; स्वस्त झाला की महाग? वाचा..

आज गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय; स्वस्त झाला की महाग? वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२२ । गेल्या काही काळात गॅस सिलिंडरचे (Gas Cylinder) दर भरमसाठ वाढले आहे. वाढत्या गॅस सिलिंडरच्या किमतीमुळे सर्वसामान्य होरपळून निघाले आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती बदलतात. आज 1 डिसेंबर रोजी तेल कंपन्यांकडून त्यात बदल करण्यात येणार होते, मात्र सध्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहेत.

सरकारी तेल कंपन्या गेल्या चार महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सातत्याने कपात करत होत्या, मात्र डिसेंबरमध्ये त्याची किंमत स्थिर ठेवण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात चढ-उतार होत आहेत. सध्या देशभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत नोव्हेंबरच्या दरावर स्थिर आहे. सध्या दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1,744 रुपये आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, यावेळी डिसेंबरमध्ये एलपीजीच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि दिल्लीत अनुदानाशिवाय 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 1,053 रुपयांवर स्थिर आहे.

इतर शहरात सिलिंडरचे दर किती आहेत
यावेळी 1 डिसेंबर रोजी सरकारी तेल कंपन्यांनी दिल्लीसह देशातील सर्व महानगरांमध्ये सिलिंडरच्या किमतीत बदल केलेला नाही. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कोलकात्यात 1,079 रुपये, मुंबईत 1,052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,068.50 रुपये आहे. नोव्हेंबर महिन्यात त्याच्या किमती बदलण्यात आल्या होत्या, त्यानंतर हा दर तसाच राहिला आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही स्थिर आहेत
सरकारी तेल कंपन्यांनी यावेळी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही बदल केलेला नाही आणि त्याचे दर नोव्हेंबरमध्ये होते तेच राहिले आहेत. दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत सध्या 1,744 रुपये आहे, तर कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 1,846 रुपये दराने उपलब्ध आहे. मुंबईत त्याची किंमत सध्या 1,696 रुपयांवर स्थिर आहे, तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,893 रुपये आहे.

या वर्षात घरगुती गॅस सिलिंडरचे दर 5 वेळा बदलले
सरकारी तेल कंपन्यांनी 2022 मध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 5 वेळा बदलल्या आहेत आणि प्रत्येक वेळी त्याचे दर वाढवले ​​आहेत. दुसरीकडे, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात यावर्षी 11 वेळा कपात करण्यात आली आहे. कंपन्यांनी 6 जुलै 2022 पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. तथापि, सरकार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलिंडरवर सबसिडी देते, ज्यामुळे त्यांना ते परवडणारे आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.