Jalgaon Crime-जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । बलात्कारासह फसवणुकीच्या दाखल गुन्ह्यातील फरार आरोपींना एमआयडीसी पोस्टेच्या शोध पथकांनी पुण्यातून अटक केली आहे. गणेश निवृत्ती सपकाळे वय 35, रा. भादली ता जि जळगाव ह. मु. पुणे, सतोष गुलाब खडे वय 45, रा. हडपसर पुणे, चंद्राकांत सुनिल जाधव वय 40, रा. हडपरसर पुणे, असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
एमआयडीसी पोलिसांत सदर तिघा आरोपींविरुद्ध बलात्कारासह फसवणुकीचे गुन्हे दाखल होते. त्यानुसार पोलीस अधिक्षक डॉ. एम राजकुमार, जळगाव. अपर पोलीस अधिक्षक चद्रकांत गवळी, जळगाव. तसेच पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे एम आय डी सी पोस्टे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील पो उप निरी अनिस शेख, सफी आनंदसिंग पाटील, पोना विकास सातदिवे, पोकों छगन तायडे यांनी आरोपी गणेश निवृत्ती सपकाळे वय 35, रा. भादली ता जि जळगाव ह. मु. पुणे, सतोष गुलाब खडे वय 45, रा. हडपसर पुणे, चंद्राकांत सुनिल जाधव वय 40, रा. हडपरसर पुणे, यांना अटक केली.
एमआयडीसीपोस्टे सिसिटीएनएस नं 0758/2022 भादवि कलम 376, 506,313 प्रमाणे दिनांक 19.10.2022 रोजी 17.51 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पिडीत महीला हीस यातील आरोपी नामे गणेश निवृत्ती सपकाळे वय 35, रा. भादली ता जि जळगाव ह. मु. पुणे यांनी लग्न करण्याचे खोटे आश्वाशन देवुन जबरीने शरीर संबंध केले बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हांतील गुन्हा घडल्या पासुन फरार आरोपी यांची गोपनिय माहीती काढुन तसेच तांत्रिक पुराव्याच्या माहीती वरुन आरोपी गणेश निवृत्ती सपकाळे वय 35, रा. भादली ता जि जळगाव ह. मु. पुणे यास दिनांक 19.11.2022 रोजी रात्री 00.30 वाजता पुणे येथिल शिरुर गावातुन ताब्यात घेण्यता आले.
एम आय डी सी पोस्टे सिसिटिएनएस नं.0614/2022 भादवि कलम 406, 420 बाबत फसवणुकचा गुन्हा दिनांक 06.08.2022 रोजी 13.41 वाजता दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हांतील फिर्यादी नामे अब्दुल जब्बार कादर पटेल रा. मेहरून जळगाव यांचे यातील आरोप क्र 1 ] सतोष गुलाब खडे वय 45, रा. हडपसर पुणे 2] चंद्राकांत सुनिल जाधव वय 40, रा. हडपरसर पुणे यांनी फिर्यादी सोबत भंगारच्या व्यवहार मध्ये भागीदारी करण्याचे विश्वास संपादन करून फिर्यादी कडील 11,90,000/- रु किंची रोख रुपये घेवुन गेला बाबत फसवणुकाच गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हांतील गुन्हा घडल्या पासुन फरार आरोपी आरोप क्र 1] सतोष गुलाब खडे वय- 45, रा. हडपसर पुणे 2] चंद्राकांत सुनिल जाधव वय 40, रा. हडपरसर पुणे यांची गोपनिय माहीती तसेच तांत्रिक पुराव्याच्या माहीती वरुन दिनांक 19.11.2022 रोजी रात्री पुणे शहरातील स्टेशन रोड परीसरातुन क्राईम युनिट नं. 01 पुणे शहर कडील पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले.