⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

चांदीच्या भावात १९०० रुपयांनी वाढ, सोनेही महागले ; तपासा आजचे जळगावमधील दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । गेल्या काही दिवसापासून सोने-चांदीच्या भावात चढ उतार दिसून येत आहे. आज (०५ मे) सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन प्रति १० ग्रॅम २१० रुपयाने महाग झाले आहे. तर चांदी  प्रतिकिलो तब्बल १९०० रुपयांनी महागली आहे.

आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव २१ रुपयांनी वाढून ४,७६० रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,६०० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५३३ रुपये इतका आहे. त्यात प्रति ग्रम २० रुपयांची वाढ झाली असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,३३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव 
आज चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज (०५ मे) चांदीच्या दरात १९०० रुपयांची वाढ झाली असून १ ग्राम चांदीचा भाव आज ७५.३रुपये इतका असून १ किलोचा दर ७५,३०० रुपये इतका आहे.

दरम्यान, कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तेथून गुंतवणूक काढून सोनेखरेदीवर भर देत आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे.