जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । दिवाळीनंतर भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज व्यवहाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर पुन्हा वरच्या दिशेने जात असून चांदी दराने देखील ५८ हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 41 रुपयांनी वाढून 50,778 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याचा दर आज 50,765 रुपयांवर उघडला गेला. तो उघडताच तो एकदाचा 50,792 रुपयांवर गेला. पण काही काळानंतर तो घसरला आणि परत 50,778 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदी देखील महागली आहे. आज चांदीचा 165 रुपयांनी वाढून 58,443 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा भाव 58, 389 रुपयांवर उघडला होता. एकदा किंमत 58,380 रुपयांवर गेली. नंतर त्यात थोडी सुधारणा झाली आणि तो 58,443 रुपयांवर व्यवहार करू लागला.
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीचे भाव घसरले आहेत. सोन्याची स्पॉट किंमत आज 0.20 टक्क्यांनी घसरून $1,663.86 प्रति औंस झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीची किंमत कमी झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 0.14 टक्क्यांनी घसरून 19.58 डॉलर प्रति औंस झाली आहे.
जळगाव सुवर्णनगरीत सध्या सध्या सोन्याचा भाव जवळपास 51,200 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर सध्या चांदीचा प्रति किलोचा दर 58,500 रुपयापर्यंत आहे. दरम्यान, दिवाळीपूर्वी सोन्याच्या भाव 51 हजाराखाली आला होता. मात्र त्यानंतर सोने पुन्हा वाढताना दिसून आले. गेल्या आठ दिवसात सोने जवळपास 900 ते 1000 रुपयांनी महागले. तर दुसरीकडे चांदी जवळपास 1200 ते 1500 रुपयांनी वधारली आहे.