भुसावळ विभागातून धावणार ‘या’ 11 गाड्या विलंबाने
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२२ । जर तुम्ही आज बुधवारी ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज 19 ऑक्टोबर 2022 रोजी, रेल्वेने विविध मार्गांवरील 152 गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये एक्सप्रेस, मेल, पॅसेंजर आणि स्पेशल ट्रेनचा समावेश आहे. याशिवाय 21 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्या विलंबाने धावणार आहेत. दरम्यान, आज भुसावळ विभागातून धावणाऱ्या अप-डाऊन भुसावळ-इगतपुरी मेमू ही गाडी रद्द करण्यात आलेली आहे.
देशातील रेल्वेने विविध मार्गांवरील 152 गाड्या रद्द केल्या आहेत. तर भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकावर उड्डाणपुलावरील गर्डरच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी १११२० भुसावळ-इगतपुरी मेमू रद्द करण्यात आली. बुधवारी (दि.१९) देखील इगतपुरी-भुसावळ मेमू धावणार नाही. दरम्यान, या ब्लॉकमुळे अप-डाऊन मार्गावरील ११ एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावल्या.
११०७८ जम्मूतवी-पुणे एक्स्प्रेस वाघळी स्टेशनवर सकाळी ८.१५ ते ११.२५ वाजेदरम्यान थांबवण्यात आली. १२१४२ पाटलीपुत्र-एलटीटी कजगावला सकाळी ८.३० ते ११.२५, गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस गाळणला ८.४० ते ११.२५, गोरखपूर-एलटीटी पाचोरात ८.४५ ते ११.२५, निजामुद्दीन-वास्को माहिजीला ९.५० ते ११.२५, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस शिरसोलीला १०.२५ ते ११.२५, गुवाहाटी-एलटीटी एक्स्प्रेस जळगावला १०.५४० ते ११.२५ वाजेपर्यंत थांबवल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. डाऊन मार्गावरील दळणवळणाला देखील फटका बसला. एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस हिरापूरला सकाळी १०.३५ ते ११.२५, एलटीटी-प्रयागराज न्यायडोंगरीला १०.४५ ते ११.२५, सीएसएमटी-हावडा पिंपरखेडला १०.५० ते ११.२५, गाेवा एक्स्प्रेस नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबवली हाेती.
ट्रेनची स्थिती कशी तपासायची
तुमच्या ट्रेनची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे स्मार्ट मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटर असेल तर तुम्ही घरी बसल्या तुमच्या ट्रेनची माहिती घेऊ शकता. यासाठी तुम्हाला https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ वर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला उजव्या बाजूला वरच्या बाजूला Exceptional Train लिहिलेले दिसेल. तुम्ही तिथे क्लिक करा आणि तुम्हाला आजच्या रद्द झालेल्या, पुनर्निर्धारित किंवा वळवलेल्या गाड्यांची माहिती मिळू शकेल. रेल्वे सातत्याने अपडेट करत असते हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे या गाड्यांची संख्या वाढू शकते किंवा कमी होऊ शकते.