जळगाव लाईव्ह न्युज ! १८ ऑक्टोबर २०२२ ! दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना राज्यात अजूनही पावसाचा जोर मात्र कायम आहे. त्यामुळे, यंदाची दिवाळीही पावसातच जाणार असल्याचा अंदाज आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 5 दिवसात तीव्र स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आज पहाटपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पावसाची पडण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर महिना अर्धा संपला तरी राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. दसऱ्यापासून जळगाव जिल्ह्यात देखील परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु गेल्या दोन दिवसापासून पावसाचे सावट आले आहे. आज मंगळवारी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पहाटपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांवर दिवाळी आहे. शेतकऱ्यांची दिवाळी या पावसाने कडू झाल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे.
दरम्यान, येत्या 5 दिवसांत महाराष्ट्रात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 2-3 दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळाची शक्यता देखील विभागाने वर्तवली आहे.

Thunderstorm activity very likely over the region during next 2-3 days.
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्यI pic.twitter.com/dMXI8X3T7w
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 17, 2022

राज्यातील या भागांना इशारा
मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्येही मंगळवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसानं झालं आहे. काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस तसेच भाजीपाला पिकाचा समावेश आहे. दुसरीकडे शेतातील भात पीक झोपल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.