गुलाबभाऊंच्या अगोदरच जळगावकर तरुणीची ‘बिग बॉस’मध्ये इन्ट्री
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर कलर्स मराठीवर प्रदर्शित होणारा ‘बिग बॉस मराठी (Big Boss season 4) च्या चौथ्या सीझनला सुरुवात झाली. २ ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सुरु झाले असून दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचं पर्व हे ‘ऑल इज वेल’ या थीमवर आधारित आहे. बिग बॉस मराठी सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नाव समोर आली असून यात जळगावातील अभिनेत्रीचा देखील समावेश आहे.
अमृता देशमुखने (Amruta Deshmukh) असे तिचे नाव आहे. अभिनेत्री अमृता देशमुख हीने बिग बॉसच्या घरात एण्ट्री केली आहे. अमृता देशमुखने ‘फ्रेशर्स’ या मालिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच आजी आणि नात यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. सध्या ती रेडिओवर ‘पुण्याची Talkerwadi‘ हा शो करते आहे. आता ती बिग बॉस मध्ये झळकणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी शिंदे गटाचे सदस्य तथा राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी बिग बॉस मराठी मध्ये जाण्याबाबत मोठे व्यक्तव्य केलं होते. ‘बिग बॉस’मध्ये बोलावलं तर नक्की जावू… अशी संधी कुणाला मिळते, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.मात्र त्याआधीच जळगावातील तरुणीची ‘बिग बॉस’मध्ये इन्ट्री होणार आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठीचे चौथे पर्व २ ऑक्टोबरपासून सुरु झाले आहे. हे पर्व पुढचे १०० दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. कलर्स मराठीवर नुकतंच याचा ग्रँड प्रीमियर पार पडला. महेश मांजरेकरांनी घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांचे अनोख्या स्टाइलमध्ये स्वागत केले आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावे
तेजस्विनी लोणारी
प्रसाद जवादे
अमृता धोंगडे
निखिल राजशिर्के
किरण माने
समृद्धी जाधव
अक्षय केळकर
अपूर्वा नेमळेकर
योगेश जाधव
यशश्री मसुरकर
अमृता देशमुख
विकास सावंत
मेघा घाडगे
त्रिशुल मराठे
रुचिरा जाधव
रोहित शिंदे