जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांवर होणार अत्याचार काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच चालले असल्याचे दिसून येतेय. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, अशातच जिल्ह्यातून अत्याचाराची एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर मेहुणबारे येथील कपाशीच्या शेतात वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. इतकच नव्हे तर हा प्रकार पिडीतेने कुणास सांगू नये म्हणून तिला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली . ही घटना चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घडलीय.
अल्पवयीन मुलीस गावातील संशयित राहुल वाल्मीक अहिरे याने फूस लावून पळवून नेले. यानंतर तिच्यावर मेहुणबारे येथील कपाशीच्या शेतात घेवून जावून रात्रीच्या वेळी तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या प्रकरणी संशयित राहुल अहिरे याच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरुन भादवी कलम ३७६. ३७३(२) (एन) (२)(जे), ३०७, ५०६ आणि लैगीक गुन्हापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४,३(ए), ४, ५,(एल)(आर) ६ आदि कलन्वय गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप.निरिक्षक प्रकाश चव्हाण हे करीत आहेत. पीडितेस उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.