PM Kisan : 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार? पण ‘या’ शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 12वा हप्त्याच्या पैशांची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच दोन दिवसात 12वा हप्त्याच्या पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण यात ज्या शेतकऱ्यांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीय त्यांचे हप्ते अडकण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 10.64 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 66,483 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. पीएम किसान योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (पीएम किसान योजना) केंद्र सरकार शेतकऱ्याला एका वर्षात 6 हजार रुपये देते. ही रक्कम एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येतात. त्यामुळे त्यात त्रुटी राहण्यास जागा नाही. शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता मिळणार आहे.
30 सप्टेंबर रोजी पैसे येऊ शकतात
या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता या महिन्यात सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करेल, असा विश्वास आहे.
केवायसी न करणाऱ्यांचे हप्ते अडकू शकतात
तज्ञ म्हणतात की ज्या लोकांनी EKYC केले आहे त्यांनाच पीएम किसानचे पैसे मिळतील. ज्या शेतकऱ्यांनी eKYC केलेले नाही त्यांचे हप्ते अडकू शकतात. पीएम किसानची ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने ३१ ऑगस्टची मुदत दिली होती. आता ती तारीख निघून गेली.
याप्रमाणे लाभार्थ्यांची यादी पहा
या योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये (पीएम किसान लाभार्थी यादी) शेतकरी त्यांची नावे ऑनलाइन देखील तपासू शकतात. यासाठी त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. पीएम किसान 2022 च्या नवीन यादीमध्ये शेतकरी घरबसल्या तुमचे नाव तपासू शकतात.
नाव तपासण्याचा हा मार्ग आहे-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://pmkisan.gov.in/.
शेतकरी corner वर क्लिक करा.
नवीन पेज उघडेल.
येथे लाभार्थी यादी पर्याय निवडा.
एक फॉर्म उघडेल. यामध्ये प्रथम राज्याचे नाव, नंतर जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
सर्व माहिती भरल्यानंतर get report वर क्लिक करा.
असे केल्याने तुमच्या गावातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्यासमोर उघडेल.