जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । हळूहळू राज्यातील पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली आहे. मात्र, मुंबईसह विदर्भासह राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. रात्री हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे.
पहाटेपासून पुन्हा मुंबईत ठिक ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. हवामान विभागानं काल विदर्भासह राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील काही ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. आजही विदर्भातील काही जिल्ह्यात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्या २ दिवसात अजून पाऊस होईल असेही म्हटले जात आहे.