जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । गेल्या काही दिवसांपासून वाढत असणारा सोन्याचा भाव स्थिर आहे. तीन दिवसापासून सोन्याच्या भावात वाढ किंवा घट झालेली नाहीय. चांदी भाव देखील तीन दिवसापासून स्थिर आहे. सोन्याची खरेदी करण्याची हीच चांगली संधी असून, आगामी काळात सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ते प्रति दहा ग्रॅमसाठी ६० हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८०२ रुपये झाला आहे. १० ग्रामचा दर ४८,२०० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५७३ रुपये इतका असून १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,७३० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
यासोबतच १ ग्राम चांदीचा भाव आज ७४ रुपये इतका आहे. १ किलोचा दर ७४,००० रुपये इतका आहे.
कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे शेअर बाजारांत घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार तेथून गुंतवणूक काढून सोनेखरेदीवर भर देत आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता आहे.