⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | पाळधीत ट्रेलर आहे.. पिक्चर अजून बाकी आहे : ना. गुलाबराव पाटील

पाळधीत ट्रेलर आहे.. पिक्चर अजून बाकी आहे : ना. गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. दुपारी पाळधी (Paldhi) येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्याहस्ते पार पडला. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन , खासदार उन्मेष पाटील आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, राजू भोळे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया आदी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी संबोधित करताना शिंदे गटाचे सदस्य तथा राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी आपल्या आशीर्वादाने गावात २४ तास ७ दिवसाची योजना आम्ही सुरु करतो आहे. हा ट्रेलर आहे मोठा पिक्चर पाहायचे अजून बाकी आहे, असे ते यावेळी म्हणाले आहे.

आम्हाला गद्दार म्हटले पण आम्ही गद्दार नाही आम्ही उठाव केला आहे. आज याठिकाणी जमलेल्या गर्दीत एकही माणूस भाड्याचा नाही हे सांगायला आम्हाला गर्व वाटतो. आपल्या आशीर्वादाने गावात २४ तास ७ दिवसाची योजना आम्ही सुरु करतो आहे. हा ट्रेलर आहे मोठा पिक्चर पाहायचे अजून बाकी आहे., असे ते म्हणाले. तसेच आजच्या सभेत एकही भाड्याचा माणूस नाहीय, असेही ते मंत्री पाटील म्हणाले.

दरम्यान, उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे, तसेच जळगावात कोळी समाज मोठ्याप्रमाणात राहतो, जवळपास १२ हजार लोकांचे पेन्शन बंद झाले, एससी प्रमाणपत्र बंद झाले आहे ते सुरु व्हावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास विशेष विमानाने मुख्यमंत्री शिंदे विमानतळावर आगमन झाले. त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. यावेळी त्यांचे शिंदे गटाचे नेते आणि पदाधिकार्‍यांनी स्वागत केले. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, आ. लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आदींसह अन्य नेत्यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.