जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२२ । राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून राज्यातील काही भागांना अलर्ट जारी केला आहे. पुढचे 3,4 दिवस राज्यातील अनेक भागात गडगडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. Rain In Maharashtra Update News
राज्यात जुलै महिना आणि ऑगस्टच्या सुरवातीला झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले होते. मात्र त्यानंतर मागील दोन ते तीन आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली. यामुळे पाण्याअभावी पिकं माना टाकत होती. काही ठिकाणे पिकांचे पाते पिवळी पडायला लागली होती. अशात शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. मात्र तब्बल 15 दिवसांपेक्षा अधिकचा काल उलटूनही पाऊस पडत नसल्याचे चित्र होते. अशातच राज्यात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार.
पुढील 3,4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह हलक्या किंवा मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. गुरुवारपासून पावसाचा जोर वाढू शकतो, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे व जळगावसह मराठवाड्यातील जालना वगळता सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबाबत हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उद्या म्हणजेच मंगळवारी (६ सप्टेंबर) मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तसेच विदर्भ मध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बुधवारी (७ सप्टेंबर) पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, जळगावमध्ये मागील काही दिवसापासून सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पुढील तीन दिवस पाऊस मुक्कामी राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, पावसाचा