वाणिज्य

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी महागली, काय आहे आजचा भाव? वाचा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२२ । आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. आज सकाळी MCX वर हिरव्या चिन्हात उघडल्यानंतर सोन्याचा भाव १०० रुपयांहून अधिकने वाढले आहे. तर दुसरीकडे चांदी १६० रुपयांनी महागली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या घसरणीनंतर या आठवड्याची सुरुवात तेजीने झाली आहे.

काय आहे आजचा भाव?
आज सकाळी MCX वर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५०,४७५ रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ५३,१८० रुपये इतका आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइटनुसार, गेल्या व्यापार आठवड्याच्या सुरुवातीला २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,२६५ होता, जो शुक्रवारपर्यंत ५०,५८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आला आहे. त्याच वेळी,चांदीचा भाव ५४,३१६ रुपयांवरून ५२,४७२ रुपये प्रति किलोवर आला आहे.

जळगावातले दर :
जळगावातमध्ये २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७,००० इतका आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास ५१,४०० रुपायांवर आला.तर दुसरीकडे चांदीचा एक किलोचा भाव ५४,००० रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button